अचानक आकडी आल्याने रस्त्यावर कोसळून तरुण गंभीर…

अचानक आकडी आल्याने रस्त्यावर कोसळून तरुण गंभीर…

सावंतवाडीतील घटना; युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी केले रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी

अचानक आकडी आल्याने रस्त्यावर कोसळून एक तरुण गंभीर जखमी झाला.ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास रामेश्वर प्लाझा परिसरात घडली.या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन ते अत्यवस्थ बनले. दरम्यान त्या ठिकाणावरून जाणारे युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू धारपवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,संतोष बाळकृष्ण मेस्त्री (४७) रा.चाराठा,असे त्यांचे नाव आहे.ते रामेश्वर प्लाजा परिसरातून मोती तलावाच्या फूटपाथवर चालत असताना त्यांना अचानक आकडी आली.यात ते त्याठिकाणी कोसळून गंभीर जखमी झाले.त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे अति रक्तस्त्राव होऊन ते अत्यवस्थ बनले.ही घटना श्री.धारपवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या युवकांना घेऊन एका वाहनातून त्यांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.सद्यस्थिती त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा