*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रांगोळी दारची अश्रू ढाळते*
909
असून आज धनत्रयोदशी
कुठे उलथले शुभ्र चांदणे
रांगोळी दारची अश्रू ढाळते
कणसात बसले रुसून दाणे
//1//
पणतीही फडफडते अशीकशी
तेल संपले वात उपाशी
पडून पाऊस हवातसा
धरेस भेटली शुभ्र कपाशी
//2//
रीक्त गोठा बसून उदास
आसू गाळतो गुरांसाठी
कधी येतील परतून ती
धरून नेली कत्तलीसाठी
//3//
नाही टिपूस शेततळ्यात
मासेही मेले *तडफडून*
तुटपुंजी ती शासन मदत
पैसे घेती किडणी विकून
//4//
आयुष्यातील प्रथम दुष्काळ
बहुतेक ठरणार अखेरचा
नाही कोणी वाली त्याला
उपयोग काय त्या सातबाराचा
//5//
बुडवून मांगल्य अश्रूमधी
कशी लावणार तो पणती
कोणी गेला पुरात वाहून
दैवानी तोडली सर्व नाती
//6//
हात जोडतो दुरून आता
नको दिवाळी अशी कोरडी
भेट दिवाळी केविलवाणी
भासते त्याला आपली तिरडी
//7//
असून राजा तो विश्वाचा
हतबल झाला आज असा
नाही पैसा दिवा लावायला
पाठी लागली *आवदसा*
//8//
विनायक जोशी 🖋️ठाणे
0611/9324324157
