You are currently viewing ‘झेप’ – कर्तृत्वाच्या अनेकविध क्षितिजांचा प्रेरणादायी प्रवास !

‘झेप’ – कर्तृत्वाच्या अनेकविध क्षितिजांचा प्रेरणादायी प्रवास !

*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या प्रतिभा पिटके लिखित पुस्तक परीक्षण*

 

*’झेप’ – कर्तृत्वाच्या अनेकविध क्षितिजांचा प्रेरणादायी प्रवास!*

 

काही पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर विचार करायला शिकवतात, प्रेरणा देतात 6आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात. देवेंद्र भुजबळ संपादित ‘झेप’ हे पुस्तक अशाच प्रकारचे आहे.

या पुस्तकात ३६ मान्यवरांच्या

जीवनप्रवासाचा आणि

कार्याचा वेध घेण्यात आला आहे. प्रत्येकाची वाट वेगळी, संघर्ष वेगळा आणि यशाची उंचीही वेगळी; मात्र या सर्वांना जोडणारा समान धागा म्हणजे जिद्द, कष्ट, ध्येयासक्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ!

मूर्तिजापूरसारख्या छोट्या गावातून जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा डॉ. विजय भटकर यांचा प्रवास खूप अनुकरणीय आहे, सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांचा प्रवासही असाच कौतुकास्पद , प्रेरणादायी ! इच्छा असली तर वरिष्ठ पदावरची व्यक्ती निर्भीडपणे समाजासाठी काय निर्णय घेऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मा मुंढे साहेब! पंढरपूरच्या वारीदरम्यान २१ दिवसांत ३,००० शौचालयांची व्यवस्था करण्याचा उपक्रम त्यांच्या नियोजनक्षमतेची आणि प्रशासकीय दृष्टिकोनाची ओळख करून देतो. नयना गुंडे या सध्या अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त असून आपल्या कार्यशैलीने त्यांनी आपली स्वतःची कर्तव्यदक्ष कार्यतत्पर संनदी

अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे,

डॉ विजय शिरिषकर ;

अठराविश्व दारिद्र्य हे शब्द कमी पडतील अशा घरातून आलेले डॉ,नी स्वकष्टाने उच्च शिक्षण घेतलेले असून समाजासाठी काही करावे यासाठी सध्या ते वसईजवळ वृद्धाश्रम चालवितात , भावेश भाटिया अंधत्वावर मात करून सनराईज कँडल्सच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतात. आजपर्यंत त्यांनी१३०००हुन अधिक प्रकारच्या कँडल्स तयार करून भारतीय कौशल्य व गुणवत्तेचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे,

राधिका भांडारकर यांची ‘माझी जडणघडण’ ही लेखमाला, पाच कथासंग्रह, तीन ललितलेख संग्रह, काव्यसंग्रह आणि ‘जिजी’ हे आत्मवृत्त त्यांच्या साहित्यिक समृद्धीची साक्ष देतात.

उमाकांत रासने ऊर्फ आप्पा रासने यांनी आपल्या उद्योगसमूहाच्या माध्यमातून ३० वर्षांत सुमारे ४,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच २५ वर्षांपासून रोटरी क्लबचे सदस्य म्हणून सामाजिक कार्यात दिलेले योगदानही कौतुकास्पद आहे. तर अलका भुजबळ यांनी असाध्य आजारावर मात करून कोरोना काळात न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरू केले संकटावर मात करून सकारात्मक कार्य करण्याची त्यांची खास शैली आहे

या सर्व व्यक्तिमत्त्वांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ स्वतःची प्रगती साधली नाही, तर आपल्या कार्यातून इतरांसाठीही प्रेरणेचे मार्ग खुले केले. ज्येष्ठ लेखकांनी आपल्या अनुभवसंपन्न लेखणीतून या व्यक्तिमत्त्वांचे विविध पैलू उलगडले आहेत. स्वतः देवेंद्रजींचे सुद्धा काही लेख यात आहेत, देवेंद्रजीनी

सर्व लेखांना एकत्रित करून वाचकांसमोर प्रेरणेचा अनमोल ठेवा ठेवला आहे. हे पुस्तक नव्या पिढीला स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा देते.

‘झेप’ हे केवळ ३६ व्यक्तिचित्रणांचे पुस्तक नसून माणसातील सामर्थ्याची जाणीव करून देणारा आपल्या स्वप्नांना नवी प्रेरणा देणारा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. झेप वाचत असतांना एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली ती अशी की स्वतः देवेंद्र भुजबळ हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहेत त्यांचा जीवन प्रवास अतिशय संघर्षमय आहे स्वकष्टाने व जिद्दीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले मोठ्या हुद्द्याची प्रशासकीय नोकरी मिळविली कोरोना काळात लिहित्या हातांना चालना मिळावी म्हणून न्यूज पोर्टल सुरू करून त्याचा झेंडा सातासमुद्रापालिकडे फडकवला असे असून त्यांच्या कार्याचा गौरव करणारा एकही लेख झेप मध्ये नाही अर्थात ही त्यांची नम्रता, विनयशीलता आहे,सुजाण नागरिकांनी झेप वाचले पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे,

या सुंदर साहित्यिक उपक्रमासाठी लेखक व संपादक देवेंद्र भुजबळ आणि सर्व लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

 

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा