*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी लिखित स्वादिष्ट पाककृती*
*बिना भाजणी चकली*
*साहित्य_:*
२ वाटी तांदूळ पीठ , अर्धी वाटी डाळव पीठ (चिवढ्यात घालतो ना ते), पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन, तळण्यासाठी तेल, तिखट ,मीठ, हिंग, तीळ ,ओवा ,जिरे हे सर्व आपल्या चवीनुसार
*कृती_:*
तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चाळलेले डाळव पीठ घालून, त्यामध्ये तिखट मीठ ओवा हिंग जिरे हे सर्व चवीप्रमाणे टाकून त्यामध्ये कडकडीत तेल तेल पाव वाटी घालावे. सर्व हाताने छान मिक्स करून घ्यावे. आणि गरम पाण्याने नेहमीप्रमाणे चकलीचे पीठ मळून मऊ करावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दहा मिनिटे थांबून चकल्या तळून घ्याव्यात…. छान कडक खुसखुशीत अशा होतात..मऊ होत नाहीत.
चकली तळणे ही सुद्धा एक कलाच आहे…🙏
