You are currently viewing मोरपंखी

मोरपंखी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोरपंखी*

🦚

 

मोरपंखी रंगाला

नाही उपमा कशाची

ईश्वरी स्पर्शाची

देणगी।।

 

गर्द हिरव्यात

निळसर मिसळते छटा

सागराच्या लाटा

अद्भूत।।

 

रमणीय पिसारा

मोराचा डौलाने खुलतो

मखमली सुखावतो

स्पर्श।।

 

गो-या रंगावर

मोरपंखी रेशमी पैठणी

लाखात देखणी

नववधू।।

 

वहीतील मोरपंख

आठवणीत आहे उरले

गालावर फिरले

हळूवार।।

 

मोरपंखी रंगाला

कान्हाच्या मुकुटात स्थान

रंग महान

ईशस्पर्शी।।

 

🦚

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा