You are currently viewing सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी मंदिरात ‘रामसेतू शिळे’चे लोकार्पण गुरुवारी
Oplus_16908288

सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी मंदिरात ‘रामसेतू शिळे’चे लोकार्पण गुरुवारी

शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

सावंतवाडी:

सावंतवाडी येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरात सिंधुदुर्गात प्रथमच भाविकांना कायमस्वरूपी दर्शनासाठी दुर्मिळ मानली जाणारी ‘रामसेतू शिळा’ उपलब्ध होणार आहे. या रामशिळेचे लोकार्पण गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी आयोजित आरतीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी होणार असून, मंदिर उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा व दात्यांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. स्वामीभक्त अमोल टेंबकर यांनी आपले पूज्य आई-वडील सौ. मंदा मंगेश टेंबकर यांच्या स्मरणार्थ ही रामशिळा मंदिराला अर्पण केली आहे.

रामायणातील कथेशी संबंधित मानली जाणारी ही शिळा पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले जाते. या रामशिळेचे दर्शन घेण्याची आणि तिला स्पर्श करून अनुभवण्याची संधी आता मंदिरात येणाऱ्या भाविकांना कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे. रामशिळेच्या लोकार्पण सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा