*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोजागरी*
ही कोजागिरी पुनव देखणी नभांतरी
मी रेगाळते उगीच चंदण्यात सौधावरी
चांदण्यांचे कवडसे हलती सागरी
हुंदाडती मजेत मंद
मंद लाटांवरी
आभा पूर्ण चंद्राची
पसरली मुखावरी
चंद्रकिरणं चमकती
लहरत्या केसावरी
दिशा दिशात शुभ्र कळ्या उमलल्या
गंधाळूनी रातराणी चमेली फुलल्या
कळ्या मोगऱ्याच्या
आज नभात गेल्या
चांदण्या होऊनी त्या प्रकाशित झाल्या
शीतल वारा किनारी झावळ्यातून झुलतो
चांदण्यांच्या पखाली
लहरीवर वाहतो
कोजागिरी ऐकते गीतलहरी दिशात
स्वर चंद्रगीतांचे
विरघळती दुधात
ही रात्र सरण्याआधी
भेट त्याची होईल
पुनवेची रात आज दोन जीवात बहरेल
@अंजना कर्णिक
