You are currently viewing चंद्राची राखी चंद्रयान-३

चंद्राची राखी चंद्रयान-३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल मंच समूहाच्या सन्माननीय सदस्या कवयित्री किरण चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंद्राची राखी चंद्रयान-३*

 

 

लई दिस,न वर्ष लोटले राखी न मिठाई भावाले

दुरून पाहतो एकमेका, शाप आहे आम्हाले

इसरोले केली पृथ्वीमाईनं विनवणी

म्हणून चंद्रवारीस चंद्रयान घडविले

 

आगस्ट पंधरा झेंडावंदन झाले

अन् वार्ता पसरली देशविदेशी

धरती मनी गदगदून गेली हर्षाने

चंद्रयान थ्री जाणारच चंद्रकुशी

 

हलकी राखी,सोनेरी कवचात

रॅकेटचा दिव्यात केली पॅकिंग

चंद्रयान थ्रीच्या कानात बोलली

करशील म्हणाली सॉफ्ट लँडिंग

 

श्रावणात हिरवी साडी परिधान करुनि

बघत बैसली एक टक दूर नभात भूमी

ठिकठिकाणी प्रक्षेपण,मुठीत वाळूसम क्षण

अखेर पोहचवली राखी,चंद्रयानाने चंद्रावरी

 

धरतीला आनंद भारी,सृष्टीने दर्शविले

सळसळ पर्णाच्या टाळ्या निसर्गाने वाजविल्या

चांदोबाला राखी भेटता,अश्रू सांडले,खड्डे पडले

चंद्रयान थ्रीने सेल्फी घेऊनि इसरोस पाठविल्या

 

धरती,गगन पुथ्वीवरील राहणारे मानव

सर्वत्र जल्लोष विजयाचा जणू आक्रोश

सर्व श्रेयाचे मानकरी,इसरोच्या टीमचे आभारी

चंद्रयान थ्री स्वप्न सफल, भारताचा जयघोष

 

भारतमातेस या सलाम आहे

वैज्ञानिक हिरे या देशाने घडविले

जगात गाजले नाव हिंदुस्थान

झेंडे उंच गगनात फडकविले

 

इतिहास रचला भारतपुत्राने

स्वर्ण अक्षरात लिहतील विजय

पुन्हा गर्जला एकच नारा

भारत माता की जय

भारत माता की जय

 

सौ किरण महादेव चौधरी

नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा