You are currently viewing कोकणात दहावीच्या परीक्षेसाठी 114 केंद्र सज्ज

कोकणात दहावीच्या परीक्षेसाठी 114 केंद्र सज्ज

यंदा 32 हजार 139 विद्यार्थी परीक्षेला बसणार

रत्नागिरी 

 माध्यमिक शालांत परीक्षेसाठी कोकण विभागातून 32 हजार 139 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्यात 560 पुनर्परीक्षार्थी तर 290 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 114 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार असून एकूण 628 शाळांमधील विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल – मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 16 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्यमंडळाने दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 21 हजार 787 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 352 विद्यार्थी परीक्षेला बसतील. रत्नागिरी जिल्ह्यात 73 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 41 परीक्षा केद्रांवर परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 204 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 86 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 21 हजार 787 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 352 विद्यार्थी परीक्षेला बसतील. रत्नागिरी जिल्ह्यात 73 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 41 परीक्षा केद्रांवर परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 204 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 86 दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कॉपी टाळण्यासाठी भरारी पथके

कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी 13 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरीत 7 तर सिंधुदुर्गात 6 भरारी पथकांमार्फत परीक्षा केंद्रावर तपासणी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा