You are currently viewing आमदार नितेश राणेंची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड.

आमदार नितेश राणेंची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड.

विशेष संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅशिंग नेतृत्व आमदार नितेश राणे यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमीच धावून जाणारे अशी ख्याती असलेले तरुण नेतृत्व म्हणजे नितेश नारायणराव राणे. आपल्या दबंगगिरी ने संपूर्ण जिल्ह्यात कार्यतत्पर नेता म्हणून ओळख असलेले नितेश राणे हाती घेतलेले कोणतेही काम लीलया करण्यात माहीर.
नितेश राणे यांचा अधिकारी वर्गावर असलेला वचक पाहता त्यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर झालेली निवड आपल्या कार्यातून ते नक्कीच सार्थ ठरवतील. शरद पवारांनी १००% फलोत्पादन अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात आंबा काजू बागायती फुलविल्या. शरद पवारांनी लावलेला छोटासा रोप आज जिल्हाभर फोफावला आहे. जिल्ह्यात बरचसं क्षेत्र बागायतींच्या खाली आलेलं आहे. जिल्ह्यातील काजूवर संशोधन झाले, नवनव्या जाती विकसित झाल्या. त्यामुळे काजू लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होऊन शेतकरी सधन झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी या दोन गोष्टी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देऊ शकतात. पर्यटनातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागू शकतो त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना तयार झाल्या तर जिल्ह्यातील मोठं क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं, आंबा, काजू, माड, फोफळींच्या बागायती मोठ्या प्रमाणावर उभ्या राहू शकतात. जेणेकरून जिल्ह्यातील शेतकरी सधन होईल आणि जिल्हा कृषी क्षेत्रातून विकासाकडे झेप घेईल. नितेश राणे यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर झालेली निवड म्हणजे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत. नितेश राणे यांनी शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आणून शेतकऱ्यांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनी न विकता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्रांती घडवावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी धनदांडग्या लोकांना आपल्या जमिनी विकून त्यावर उदरनिर्वाह करतात, याच जमिनी धनदांडगे लोक विकत घेऊन, कधी कधी तर फसवून, लूटमार करून परप्रांतीय लोकांना कित्येक पटीने चढ्या दराने विकतात. त्यामुळे कोकणात गावागावात परप्रांतीयांचे बस्तान बसू लागले आहे. याला आळा बसला पाहिजे तर शेतकऱ्यांना सरकारकडून शेती, बागायतींसाठी मदत मिळणे गरजेचे आहे.
नितेश राणे शेतकरी नसले तरी पारंपरिक शेतकऱ्यांबद्दल त्यांना आस्था आहे. शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात प्रगती साधावी यासाठी नक्कीच ते कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यरत राहतील यात शंकाच नाही. कृषी कार्यकारी परिषदेवर निवड झाल्याने नितेश राणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 5 =