You are currently viewing युग्धा बांदेकर हिचा जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते सत्कार

युग्धा बांदेकर हिचा जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते सत्कार

अबँकस स्पर्धेत राज्यात प्रथम : शैक्षणिक वाटचालीस दिल्या शुभेच्छा

बांदा

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तालुका बांदा मंडळ तर्फे माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते अबँकस स्पर्धेत राज्यात प्रथम आलेली बांदा जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.1 ची विद्यार्थीनी युग्धा दीपक बांदेकर हिचा सत्कार करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी पंचायत समिती प्रभारी सभापती शितल राऊळ, जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर सरपंच अक्रम खान, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा संदीप बांदेकर, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, मंडल प्रभारी दादू कविटकर, बांदा महिला अध्यक्षा अवंती, पंडित ग्रामपंचायत सदस्य अंकिता देसाई व किशोरी बांदेकर, दीपक सावंत, बाळा अाकेरकर, युवा मंडळ अध्यक्ष मकरंद तोरस्कर, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजेश बांदेकर, दीपक बांदेकर उपस्थित होते. इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबँकस स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून पाच मिनिटात 120 पैकी 120 गणिती अचूक सोडवून युगधाने या राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. राज्यभरातून या स्पर्धेत दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या मिळवलेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे तिचे व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 9 =