You are currently viewing शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुढाकारातून आजगाव वसवाचे तळे शाळेला संगणक प्रिंटर भेट!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुढाकारातून आजगाव वसवाचे तळे शाळेला संगणक प्रिंटर भेट!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुढाकारातून आजगाव वसवाचे तळे शाळेला संगणक प्रिंटर भेट!

प्रविण पालव यांच्या पाठपुराव्याचे चंद्रकांत (बाळा) गावडे व शिक्षकांकडून विशेष कौतुक

आजगाव, प्रतिनिधी :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संघटक चंद्रकांत (बाळा) गावडे यांच्या वतीने आजगाव वसवाचे तळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक प्रिंटर भेट देण्यात आला. या उपक्रमातून पक्षाची सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक गरजांप्रती असलेली जाणीव अधोरेखित झाली.

शाळेला संगणक प्रिंटर मिळावा, यासाठी धाकोरे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख प्रविण पालव यांनी पुढाकार घेत पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत बाळा गावडे यांनी शाळेला प्रिंटर उपलब्ध करून दिला.

प्रविण पालव यांच्या कार्याचे विशेष कौतुक!

शाळेच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रविण पालव यांचे चंद्रकांत (बाळा) गावडे आणि शाळेतील शिक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या पुढाकारामुळे शाळेला आवश्यक सुविधा मिळण्यास मदत झाली. यावेळी सामाजिक कार्यातून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी संवाद मीडियाचे संपादक राजेश नाईक,शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख राजू शेटकर, प्रविण पालव, अर्जुन पालव, बबन गावडे, शिक्षक रणशूर परब व ग्रामस्थ उपस्थित होते.

“८०% समाजकारण व २०% राजकारण” या शिवसेनेच्या धोरणानुसार शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासासाठी सहकार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी बाळा गावडे यांचा सत्कार प्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा