You are currently viewing आगारातील वाहक चालकांची थर्मल तपासणी करा; जनसंपर्क अधिकाऱ्यांचे आदेश

आगारातील वाहक चालकांची थर्मल तपासणी करा; जनसंपर्क अधिकाऱ्यांचे आदेश

जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांची सावंतवाडी आगाराला भेट…

सावंतवाडी

सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या प्रत्येक एस्टी मधील वाहक चालकाची थर्मल टेस्टिंग आणि स्टेंडवर सॅनिटायझर ची सोय करण्याचे आदेश जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी आगार प्रमुख वैभव पडोळे यांना देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.

ते म्हणाले की, २३ मार्च पासून जुन पर्यंत लॉक डाऊन काळात परिवहन मंडळाने शासनाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन केले असून, लॉक डाऊन पूर्वी परिवहन मंडळ २२ कोटींचे उत्पन्न घेत होती. परंतु आता १० कोटीच उत्पन्न घेत आहे. तसेच नियमित प्रवाशी गाड्या सोडून इतर सर्व वाहतूक बंद असल्याने परिवहन मंडळाचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच कोरोना मुळे प्रवासी आजही एस्टी कडे साशंक नजरेने पाहत प्रवासी कमी झाले आहेत.

तसेच सावंतवाडी आगारात काल झालेल्या प्रकारावरून त्यानी आगार प्रमुखांची कानउघडणी केली असून, प्रत्येक चालक वाहकाची थर्मल टेस्ट, सॅनिटायझर ची सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक एस्टी संपूर्ण क्लीन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच एस्टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे असलेले प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर होतील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + six =