You are currently viewing महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर…

सिंधूदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हयाची कार्यकारीणी बुधवारी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जाहीर केली. यात जिल्हा उपाध्यक्ष पदी समिल जळवी, प्रमोद गवस, सचिव पदी कृष्णा सावंत, शिरीष नाईक, खजिनदारपदी सौ.संजना हळदिवे आणि सहखजिनदारपदी संजय भाईप यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसन्न गोंदावळे, विष्णू धावडे, मिलिंद धुरी,आनंद कांडरकर आणि सल्लागार पदी अँड सिद्धिका भांडये, राजेश हेदळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी जिल्हाध्यक्ष खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पत्रकार तुळशीदास नाईक, सुमित दळवी, प्रशांत गवस, विनय वाडकर, गोविंद शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =