You are currently viewing सावंतवाडी खासकीलवाडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी खासकीलवाडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी खासकीलवाडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी

खासकीलवाडा श्रीदेवी वटसावित्री मंडळ व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 16 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते*.

*या शिबिराचे आयोजन माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब आणि विद्यमान नगरसेविका तथा बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सीमा नाईक यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते*.

*शिबिराचे दीपप्रज्वलन भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे जनरल सर्जन डॉ. अकबर, तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. हर्ष सागावकर व नगरसेविका सौ. सीमा नाईक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.*

*यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपला दवाखान्याच्या अध्यक्षा व नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, माजी नगरसेवक व विद्यमान भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजच्या संचालक उमाकांत वारंग नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, मराठा महिला समाजाच्या अध्यक्षा सौ. संजना संजू परब, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर, निवेदिका श्रीमती सरोज दाभोलकर, जागृती बेकनाळकर, परिचारिका तृप्ती अंधारी, लॅब टेक्निशियन गायत्री वारंग, आरोग्य सेवक दत्तात्रय माळी, परिचर गंगा सुतार, यशवंत परब, श्रीमती नीलम कुमठेकर, शुभदा तिरोडकर, मांजरेकर आदी नागरिक उपस्थित होते*.

*मार्गदर्शन -*

*यावेळी नगरसेविका सौ. सीमा नाईक यांनी मार्गदर्शनपर केले असता, प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी*. *आपला दवाखाना मार्फत रक्त तपासणी व औषधोपचार मोफत केले जातात, असे आव्हान नगरसेविका सौ सीमा नाईक यांनी केले*.

*माजी नगरसेवक तथा भाईसाहेब सावंत महाविद्यालयाचे संचालक श्री. उमाकांत वारंग यांनी, महाविद्यालयात गेल्या चार महिन्यात अनेक तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाली असून तालुक्यातील तसेच शहरवासीयांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले*.

*डॉ. अकबर यांनी, सध्या गर्भाशयाच्या कॅन्सर सह विविध कॅन्सरवर प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन भविष्यातील कॅन्सरचा धोका टाळावा, असे मार्गदर्शन केले.*

*तसेच विद्यमान नगरसेविका सौ सुकन्या टोपले यांनी शहरांमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अध्यक्षा या नात्याने आपण शहरांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आरोग्य शिबीर लावून नागरिकांना तसेच महिलांना या शासकीय आरोग्य सुविधाचा लाभ येण्यासाठी आव्हान विद्यमान नगरसेविका सौ सुकन्या टोपले केले आहे*.

*तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना) बद्दल माहिती दिली.*
*ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही योजना सुरु केली तेव्हा 750 खाजगी रुग्णालये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जोडलेली होती. आताच्या सरकारने आता ही मर्यादा वाढून 2399 प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होतात, त्यापैकी 116 शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात होतात व 1400 हून खाजगी अधिक अधिक महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील रुग्णालयात होतात.*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 खाजगी रुग्णालये या योजनेत आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड व आधार कार्डवर ही सुविधा मिळत होती आता सर्व रेशनिंग कार्ड धारकांना म्हणजेच पांढऱ्या रेशन कार्ड ला सुद्धा ही मोफत आरोग्य सुविधा मिळाली आहे यासाठी पाच लाख रुपये दरवर्षी. कुटुंबांकरता तसेच 70 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींकरता व कुटुंबांकरता दहा लाख रुपये ही मोफत आरोग्य सुविधा शासनाने ठेवली आहे*
*यासाठी आयुष्यमान भारत महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना कार्ड काढून घेतले पाहिजे तसे प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड न काढल्यास या आरोग्य सुविधाचा मोफत लाभ मिळत नाही* *मात्र 40% जिल्ह्यातील नागरिकांनी अजूनही आयुष्यमान भारत कार्ड काढलेले नाही, त्यामुळे मोफत शस्त्रक्रियेपासून ते वंचित राहतात.*
*यासाठी नागरिकांनी रेशन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन शासकीय रुग्णालयात हे कार्ड मोफत काढता येते. किंवा ई सेवा केंद्र यावरती आपण हे कार्ड काढू शकतात*.

*तसेच प्रत्येकाने वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यावर दर तीन महिन्यांनी सकाळीउपाशीपोटी लिपिड प्रोफाईल (कोलेस्ट्रॉल) तपासणी करून घ्यावी. 200 ते 150 पेक्षा मध्ये असणे कोलेस्टार लिक्विड असणे गरजेचे आहे तसेच जास्त कोलेस्टरॉल असल्यास हृदयविकार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, व कोलेस्टर कमी करण्याच्या गोळ्या व औषधोपचार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यात याव्या अन्यथा हृदयविकार व पक्षाघाताचा धोका संभवतो, असेही त्यांनी सांगितले.*

*डॉ. हर्ष सागावकर यांनी, आपला दवाखाना मार्फत लिपिड प्रोफाईल, थायरॉईडसह सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या व औषधोपचार मोफत दिले जातात, या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, सायंकाळी चार ते साडेआठ या वेळेत रुग्ण तपासणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपला दवाखाना यामध्ये सालईवाडा चर्च शेजारी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार होतात असे सावंतवाडी उपस्थित नागरिकांना आवाहन डॉक्टर हर्ष साळगावकर यांनी केले*.

*शेवटी आभार प्रदर्शन विद्यमान नगरसेविका सौ. सीमा नाईक यांनी केले.*

*शिबिरात अनेक नागरिकांनी लाभ घेऊन तसेच रक्त तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला पाहिजे असे बहुमूल्य मार्गदर्शन आभार प्रदर्शन वेळी करण्यात आले.*अनेकनागरिकांनी या शिबिराचा मोफत लाभ घेतला*

प्रतिक्रिया व्यक्त करा