You are currently viewing कोण कुणाचे कळेना

कोण कुणाचे कळेना

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कोण कुणाचे कळेना*

〰️〰️〰️〰️〰️〰️

आजकाल शून्य साऱ्या जाणीवा

नाही उरल्या ,आज कुठे संवेदना

स्पंदने आताशा निर्जीव जाहली

अर्थही जगण्याचा जीवा कळेना

संभ्रम अंतरात इथे कोण कुणाचे

गूढ ते अंतरातील सहजी कळेना

इथे भासे सत्य असत्य असंबद्ध

शाश्वती , मन:शांती कुठे दिसेना

कुठले ऋणानुबंध कुठली नाती

आपुलेपणाचा स्पर्शच जाणवेना

सर्वत्र भौतिक सुखाची लालसा

निस्वार्थी प्रीती कुठेच पाझरेना

जो तो आज स्वसुखात गुंतलेला

सत्यार्थ जीवनाचा कुणा उमगेना

सांगा आता कसे या जगी जगावे

निश्चिंतता जगती कुठेच जाणवेना

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*©️वि.ग.सातपुते.( भावकवी)*

*दिनांक:- १६ ऑक्टोबर 2026*

प्रतिक्रिया व्यक्त करा