You are currently viewing प्रीतीचा अंत

प्रीतीचा अंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रीतीचा अंत*

 

तुला पाहता -पाहता नेत्र जडावून गेलेले

तुला सांगता -सांगता शब्द सारे संपून गेलेले

 

तुला साठवता साठवता डोळे तुडुंब गोठलेले,

तुझी सुंदरता सुंदरता साऱ्या शब्दां निशब्द करते झालेले

 

एक वादळ वादळ तुला घेऊनचि गेलेले,

तुला जपता-जपता मला भरकटवून गेलेले

 

पाहता-पाहता पहा हे डोळे भरून आलेले,

जप जप जपलेले आपले प्रेम त्या अश्रूं वाहूनची गेलेले

 

त्या अंधारी चाचपडता चाचपडता श्वासही ठेचकाळलेला

जप जप जपलेल्या प्रीतीचा वाटे आज अंत आहे झालेला

 

—राजा जोशी

9823687519

१५ ऑक्टोबर २०२६

❤️ ❤️ ❤️ ❤️

प्रतिक्रिया व्यक्त करा