*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चिऊताईचं बाळ*
चिऊताईचं मी बाळ
शिकतोय चिऊचिऊ
आई म्हणते खोपा सोडून
मुळीच नको जाऊ……
लुसलुशीत अळी आणते
दाणे आणते खायला
शहाण्यासारखं वागायचं
दंगा नको करायला…..
पंख तुमचे कोवळे
नाजूक आहेत आता
भरु द्या शक्ती त्यात
येईल हळूहळू उडता……
आई दूर गेली की
आम्हाला करमत नाही
काठावरून खोप्याच्या
तिची वाट बघत राही….
इवल्याशा चोचीत दाणे
सगळ्यांना आई भरवते
नीज येता संध्याकाळी
प्रेमाने पंखाखाली घेते….।।
अरुणा दुद्दलवार@✍️
