You are currently viewing निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

सावंतवाडी भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी

भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व शहर भाजपच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे. तसेच नगरपालिकेतील सफाई कामगारांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, अमित गंवडळकर, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, महेश पांचाळ, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + one =