You are currently viewing रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व मळीवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन ठिकाणी वनराई बंधारे

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व मळीवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन ठिकाणी वनराई बंधारे

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व मळीवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन ठिकाणी वनराई बंधारे

जेसीबीच्या सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम; रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक आळवे यांचे ग्रामस्थांकडून आभार

मळीवाडी :

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि मळीवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गावातील दोन ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने तसेच ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करून अंगमेहनतीने हे काम पूर्ण केले. पाण्याचा साठा वाढविणे आणि जलसंधारणाला हातभार लावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात दशरथ शिंदे, पांडुरंग शिंदे, श्यामसुंदर गवस, दादा परब, प्रशांत धुरी, दीपक तळेकर, हरिश्चंद्र तळेकर, प्रदीप तळेकर, भिकाजी तळेकर, राजेंद्र धुरी, दुर्वा शिंदे, सावित्री तळेकर, स्वाती दळवी, प्रांजल धुरी, समीक्षा दळवी, उर्मिला दळवी आणि परनिका शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष दीपक आळवे, अरुण मालनकर, बबली राणे, प्रदीप तळेकर यांच्यासह बहुसंख्य मळीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
जलसंधारणाच्या या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मळीवाडी ग्रामस्थांच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक आळवे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा