*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्त्री जन्म*
केविलवाणी
स्त्रीजन्मा ही कहाणी
बैस कुम्पणी
आयुष्यभर
गुन्तला जीव सखे
संसारावर
केलीस तू गे
अमाप माया संसारी
जीवनभर
तरी एकटी
रितेपण वाट्याला
तुझ्याच येई
ओढ संसारी
पती मुलांस प्रेम
अर्पित राही
तुझीच झोळी
कुणी भरली प्रेमे
आठवते का?
रंगमंची या
कुटुंबाच्या भरले
जीवनरंग
कोरडीच तू
राहिलिस अलिप्त
शुष्क बेरंग
स्त्रीशक्ती धुरा
उचलुनी घे हाती
जन जागृती
नसे अबला
दशभूजा धारिणी
समर्थ नारी
जना सामोरी
ती कवचकुंडले
दाव ज्ञानाची
सात्विक तेजे
घे उत्तुंग भरारी
तोड कवाडे
तू स्वसामर्थ्ये
न लढता कुणाशी
हो विजयश्री
यातच शान
सुगृहिणीची सत्ता
एकात्मतेची
जरी वीरश्री
तरी तू गृहलक्ष्मी
असे संसारी
तुझ्या गृहाची
तूच देवता नारी
रक्षण करी.
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर
आर्टिस्ट.
