You are currently viewing मकरसंक्रांतीच्या निमित्ताने काही…

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने काही…

*काव्यनिनाद साहित्य मंच, पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री सौ.स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मकरसंक्रांतीच्या निमित्ताने काही….*

मनात असावा स्नेह
तिळासारखा लख्ख
गोडी मात्र असावी
गोड गुळाएवढी चक्क….

स्वभावात असावी नम्रता
तेच खरे सौंदर्य
जोडीला असेल विद्वत्ता
तेच तर ऐश्वर्य….

मनात नसावे किल्मिष
आणि अहंकाराला थारा
सोडून द्या त्यांना
वाहिल निर्मळ झरा….

सजेल तुमचे मन असे
हे सालंकृत अलंकार
तीळगूळ घेऊन गोड बोलण्याचे
कशाला हवेत सोपस्कार ?….

शुभ्र हलव्यालाच फक्त
शोभून दिसतात काटे
विचार मात्र करू नये
उगाच उलटेसुलटे….

सौ.स्वाती गोखले.
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 12 =