You are currently viewing खात्रीचं कुठाय गणगोत
Oplus_16908288

खात्रीचं कुठाय गणगोत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खात्रीचं कुठाय गणगोत*

 

दिवसभर मी काय करू

नको जाऊ ठेवून एकटीला

गर्दुले सारे मारती चकरा

नाही कोणी मजला साथीला

//1//

शाळेपाशी मुले अडवतात

कोणी धरतो झिंज्या माझ्या

कोणी आडवतो रस्त्यात

म्हणतो करू देवीची पूजा

//2//

सोडून बसली पोर लज्जा

ओढून वेणी मास्तरणीची

शाळेत घालतात *हैदोस*

कुणी न घेतो तक्रार त्यांची

//3//

असली जरी तक्रार कमिटी

करतात मांडवली सगळे तेच

खोडी काढून पळतात पोरे

कसे पकडायचे पडलाय पेच

//4//

शिक्षक सारे झालेत हैराण

टगेगिरी चालते *राजरोस*

आपले ओठ आपली जीभ

पायात नाही कुणाच्या पायपोस

//5//

जाता सारे ऊस तोडायला

असते एकटी झोपडीत

नाही कुत्रा भुंकायला सुध्दा

खात्रीच कुठाय *गणगोत*

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

1110/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा