You are currently viewing सावंतवाडीत मॉर्निंग बॉईजच्या क्रिकेट हंगामाला उत्साहात प्रारंभ!

सावंतवाडीत मॉर्निंग बॉईजच्या क्रिकेट हंगामाला उत्साहात प्रारंभ!

सावंतवाडीत मॉर्निंग बॉईजच्या क्रिकेट हंगामाला उत्साहात प्रारंभ!

मुन्ना कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील क्रिकेटप्रेमींच्या मॉर्निंग बॉईज क्रिकेट हंगामाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. महापुरुष देवस्थानासमोर मुन्ना कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या क्रिकेट हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

हंगामाच्या पहिल्याच दिवशी मैदानावर रंगलेल्या क्रिकेटने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. मुन्ना कोरगावकर यांची प्रभावी आऊट कटर गोलंदाजी, संदीप कांदे यांच्या मुलाने घेतलेला अप्रतिम झेल, तर पप्पू कांदे यांच्या मुलाने मिडविकेटच्या दिशेने लगावलेला देखणा फटका हे आजच्या खेळाचे विशेष आकर्षण ठरले.

मुन्ना कोरगावकर यांच्या मुलासमोर हर्षने टाकलेला तोंडावर येणारा धोकादायक चेंडू त्याने सहजपणे लेग साईडला टोलावला. त्याच्या या फटक्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच दिवशी मैदानावर पाहायला मिळालेली ही चुरस आणि खेळाडूंची कौशल्यपूर्ण कामगिरी यामुळे क्रिकेट हंगामाची सुरुवात रंगतदार ठरली.

दरम्यान, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मॉर्निंग बॉईजची पारंपरिक लेदर बॉल गेट-टुगेदर मॅच यंदा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्याचा निर्णय सकाळी झालेल्या चर्चेदरम्यान घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा