You are currently viewing मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या शेतीविषयक योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न.

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या शेतीविषयक योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न.

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या शेतीविषयक योजनांची माहिती कार्यक्रम संपन्न.

चिपळूण (मांडकी-पालवण),

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या शेती संदर्भातील विविध योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवले जात आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शनकांनी शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री. मनोज गांधी, उपकृषी अधिकारी श्री. विकास पिसाळ आणि ‘आत्मा’चे बी.टी.एम. श्री. पंकज कोरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेतकरी कल्याणासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाकडून विविध अनुदाने व प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. शेतकरी बंधूंसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या योजनांची जसे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान , कांदा चाळ , शेडनेट हाऊस ,हरितगृह , सामूहिक शेततळे , प्लास्टिक मल्चिंग , ड्रॅगन फ्रूट लागवड , जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, आंबा लागवड अनुदान, प्रक्रिया, साठवणूक व पायाभूत सुविधा, शीतगृह , फार्म गेट पॅक हाऊस , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना , पशूखाद्य उत्पादन उद्योग, ठिबक सिंचन व तुषार सिंचन , कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी सुरक्षा व आर्थिक मदत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना,
महिला शेतकरी ओळखपत्र ,प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, पीएम किसान सन्मान निधी ,प्रशिक्षण व शाश्वत शेती, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण , नैसर्गिक शेती या योजनांची माहिती श्री विकास पिसाळ यांनी दिली.
कार्यक्रमाच्या वेळी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे आणि उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आर्या गायकवाड प्रस्ताविक कु. जिज्ञासा सांबारे व आभार प्रदर्शन हे कु. प्राजक्ता कुंभार या विद्यार्थ्याने केले. या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा