You are currently viewing शिक्षक समितीचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहील…

शिक्षक समितीचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहील…

शिक्षक समितीचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहील…

शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे:कुडाळ येथे संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

ओरोस

शिक्षण व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक समिती आपला लढा सुरूच ठेवेल. शिक्षक समिती ही लढावू संघटना आहे, आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हा आमचा स्थायीभाव आहे.यापुढेही अन्यायाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील.समस्त शिक्षकांनी शिक्षक समिती नावाची चळवळ अधिक बळकट करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा व कुडाळ तालुका संयुक्त त्रैवार्षिक अधिवेशनात केले.

शिक्षक समिती सिंधुदुर्ग व कुडाळ तालुका यांचे संयुक्त त्रैवार्षिक अधिवेशन मराठा समाज सभागृह कुडाळ येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या अधिवेशनास राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, प्रमुख वक्ते भाऊसाहेब चासकर, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, सातारा शिक्षक बँक अध्यक्ष विशाल कणसे, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण व चंद्रकांत अणावकर, राज्य कार्य.सदस्य नामदेव जांभवडेकर, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, कोकण विभाग सचिव संतोष परब, कोकण विभाग संपर्कप्रमुख प्रशांत मडगावकर, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, प्रवक्ता सुनील चव्हाण, शिक्षक बँक उपाध्यक्ष संतोष राणे, कुडाळ संचालक विजय सावंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, सचिव वैभवी कसालकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सचिव महेश कुंभार, रत्नागिरी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष विजय पंडीत, रत्नागिरी शिक्षक बँक माजी अध्यक्ष विलास जाधव, वाळवा (सातारा) तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व सचिव तसेच तालुका पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या जर्मनी येथील उल्व्ह यांनी कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विजय सावंत यांच्या कुडाळ शिक्षक ग्रुपने सुश्राव्य असे ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाद्यक्ष नारायण नाईक व कुडाळ अध्यक्ष प्रसाद वारंग यांनी केले. मागील कार्यकाळाचा कार्यअहवाल व मागण्यांची सनद सरचिटणीस सचिन मदने व कुडाळ सचिव महेश कुंभार यांनी सादर केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क बचाव समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर (अकोले अहमदनगर)यांनी सरकारी शाळांसमोरील आव्हाने व शिक्षक पालकांची भूमिका यावर व्याख्यान दिले.वेंगुर्ले तालुका शाखेने तयार केलेल्या २०२४ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.संघटनेने २०२३ मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील टॉप टेन ठरलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.तसेच राज्य व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,परीक्षेस सहकार्य करणारे शिक्षक,तसेच राज्य पदाधिकारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी शिक्षक भारती संघटनेतून काही शिक्षकांनी शिक्षक समितीत प्रवेश केला त्यांचे स्वागत करण्यात आले.कुडाळ तालुका शाखा कार्यकर्ते यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्हा व कुडाळ तालुका यांची नूतन कार्यकारिणी राज्याध्यक्ष यांनी घोषित केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ सावंत व सानिका मदने यांनी केले. आभार सचिन मदने यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा