(प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
विटे शहरास सन 1998 रोजी घोगाव योजना मंजूर झालेली होती. आज त्या योजनेस 28 वर्ष पूर्ण होत असल्याने सदर योजनेच्या असणाऱ्या सर्व पाईपलाईन्स व मोटारी कालबाह्य झाल्या आहेत. विटे शहरास होणारा पाणीपुरवठा बरेच दिवसापासून हा अनियमित व खंडित होत आहे. याबाबत आमदार सुहास बाबर व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी विटे शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते. विटे शहरास दररोज व पुरेसे पाणी देण्याबाबत शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. आज ती बऱ्यांअशी पूर्णत्वास आलेली आहे. आज नवीन वाझर पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याबाबतची माहिती आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा सौ काजल म्हेत्रे व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी या सुरू असलेल्या योजनेची माहिती घेऊन सदर काम अधिक जलद गतीने पूर्ण करण्याबाबत प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या. सदर कामाची पाहणी विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच पाणीपुरवठा सभापती सुरेश पवार यांनी केली. आळसंद जलशुद्धीकरण केंद्र येथील सदर योजनेला समक्ष भेट देवून पाहणे केली पाहणी करत असताना या योजनेमधील केमिकल स्टॉक तसेच पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीचे पाहणी करून तेथील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या. सदर काम अधिक जलद गतीने करणे बाबतच्या सूचना पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख नागेश पेठे व अनिल पवार यांचे सर्व टीम व ठेकेदार यांना दिलेल्या आहेत. सदर काम संबंधित कर्मचारी रात्रं दिवस करत आहेत. विविध कारणामुळे शहराला पाणीपुरवठा नियमित व पुरेसा होत नाही याची जाणीव नगरपालिका प्रशासनास आहे. लवकरच त्यात सुधारणा होऊन पाणी नियमित पुरवले जाईल. असे पालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. लोकांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून मोबाईल ऍपवर पाणी सोडण्याच्या वेळा कळवण्यात येत आहेत.
