You are currently viewing तिलारी कालव्यात गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह

तिलारी कालव्यात गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह

तिलारी कालव्यात गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह

इन्सुली-डोबाशेळ परिसरात खळबळ; मृताची ओळख अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

बांदा, प्रतिनिधी :
इन्सुली-डोबाशेळ येथील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यासह घटनेचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा