You are currently viewing अशी आहे हो मराठी माझी…
Oplus_16908288

अशी आहे हो मराठी माझी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशी आहे हो मराठी माझी…*

 

मराठी माझी आहे लाडकी किती मी सांगू बाई

नसानसात मराठी माझी..( आई..)

 

कीर्तिवंत ती मराठी माझी

किती गाजते आहे ती गाजी

ज्ञाना तुक्याची जनाबाईची

कर्ममेळा नि नामदेवाची

संत पंत नि महंत झाले भाषा ही शाहिरांची

नसानसात मराठी माझी..

 

झेंडा लागला अटकेपार

शिवरायांची लाडकी फार

राजे संभाजी लिहिती बुक

तर्खडकरांचे व्याकरण खूप

वामन पंडित पठ्ठे बापूराव अजून ताजी ताजी..

नसानसात मराठी माझी..

 

किती कविंनी केले नमन

शिरवाडकरांचे अनमोल दान

सुरेश भटांची तऱ्हाच न्यारी

पाटणकरांची गझल भारी

कानेटकरांची बाकी बाबांची, टाळमृदंगाची..

नसानसात मराठी माझी..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा