रिया ला अखेर अटक

रिया ला अखेर अटक

रिया ला अखेर अटक

मुंबई / प्रतिनिधी :-

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एनसीबी च्या सूत्रांच्या दिलेल्या माहिती नुसार , रिया चक्रवर्ती ला आज अखेर अटक झाली.ड्रग्स खरेदी आणि सेवन प्रकरणी रियाला अटक केली गेली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियची गेल्या तीन दिवसापासून एनसीबी कडून चौकशी सुरू होती. रिया चा भाऊ शौविक आधी पासूनच ड्रग्स प्रकरणात एनसीबी च्या अटकेत आहे.

एनसीबी ने एनडीपीएस अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. आजच्या चौकशी दरम्यान रियाने आपण सुशंतच्या दबावामुळे ड्रग्स चे सेवन केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.मात्र या प्रकरणी रियाला जमीन मिळण्याची शक्यता असल्याने एनसीबी रिमांड मागणार नसल्याचं समजतं आहे.रियाला अटक जारी करण्यात आली असली तरी एनसीबीन तिच्या कोठडीची मागणी केलेली नाही.
रिया हव्या त्या वेळी चौकशीसाठी उपलब्ध होती म्हणून फक्त अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

रिया च्या आधी तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यालाही एनसीबीने अटक केली आहे. एनडीपीएसच्या कलम 20 (B), 28, 29, 27 (A) अंतर्गत दोघांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीला शौविक आणि ड्रग पेडलर यांच्यात बातचीत झाल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा