*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”प्रारब्ध”*
ईश्वर सद्गुरु बदलती प्रारब्ध
यत्न तो देव जाणावा बदले प्राक् तनIIधृII
सद्गुरु कृपेचा घेऊन आधार
विवेकाचा करू सक्रिय अंगिकार
मोठी उपलब्धी आहे मानवी जीवनII1II
प्रारब्धाकडे पाहू सकारात्मकतेनं
शिकायचे धडे शिकवते प्रारब्ध
प्रारब्ध संपवावे लागते भोगूनII2II
वर्तमान कर्म होय क्रियमाण कर्म
कर्माचा संचय होत संचित कर्म
या जन्मांत भोगावे लागते ते प्रारब्धII3II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.
