*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. संध्या कुलकर्णी लिखित लेख*
*बाळंतिणीचा आहार*
खसखस खीर, अळीवाची खीर, डिंक लाडू, मेथी लाडू सकाळीच हे सर्व खाणे. दुधात खारीक पावडर घालून दुध प्यावे. सुंठ पावडर ही घालावे थंडी होत नाही
दुपारी-: मेथीची भाजी रोजच खाणे त्याशिवाय इतर पालेभाज्या व पातळ भाज्या मिक्स पिठाची भाकरी पण तुपात चोपडलेली पचायला हलकी होते. खोबरे व भरपुर लसूण घालून चटणी व ही चटणी गरम भातावर घालून थोडे मीठ व तुप घालून खावे. तसेच रात्री गरम भातावर मिरे पावडर मीठ व तुप घालून प्यावे. कढण प्यावे. दुपारी जेवणानंतर ओवा, जवस व तिळ हे विड्याच्या पानात घालून खावे. म्हणजे बाळाला गॅस धरत नाही ओव्यामुळे👍 जवस तिळ पानातुन कॅल्शियम मिळते जे की बाळंतपणात कमी झालेले असते ते भरून निघते. ओवा खाऊन बाळाच्या बेंबीवर व तोंडात हळुच फुंकर मारावी. पण ओवा जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. रात्री मुगाचे वरण भात पोळीला तुप चोपडून कुस्करून खावे. सर्व भाज्या खा पण वातुळ बटाटा वांग नको. मसालेदार, तळण नको बाळाला त्रास होऊ शकतो. कानात कापसाच्या बोळ्यात एक लसूण पाकळी घालून मग ती कानात घालून ठेवावी म्हणजे थंडी बाधत नाही. शेक शेकोडी घ्यावी.
सौ.संध्या कुलकर्णी, सातारा…
