You are currently viewing जागतिक ग्राहक दिन निमित्ताने तळेरेत पथनाट्याव्दारे जनजागृती

जागतिक ग्राहक दिन निमित्ताने तळेरेत पथनाट्याव्दारे जनजागृती

तळेरे

१५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. स्पर्धेच्या युगात सुशिक्षित ग्राहक देखील कधी कधी स्वतःचे हक्क – अधिकार विसरतात आणि नुकसानास बळी पडतात. ग्राहकाना सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, स्वतःचे म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार करणे व ती निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक हक्कांच्या शिक्षणाच्या अधिकाराचा हक्क या सर्वांबाबत जन जागृतीपर तळेरे येथे विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करीत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तळेरे एसटी स्टँड आणि बाजारपेठ येथे आठवडी बाजारात जमलेल्या जन समुहास पथनाट्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला.या पथनाट्य सादरीकरणात विघ्नेश पेडणेकर, अरविंद इलावडेकर, सौरभ राणे, मिलिंद बंदरकर, मिनाक्षी वेदरकर, दिव्या तावडे, दत्तराज राणे, ज्योत्स्ना नारकर, सोनाली कोकरे, दर्शना मटकर, पूजा अमरस्कर, रुचिता परबते, सायली गोसावी, सारिका चव्हाण, प्रणाली मांजरेकर या श्रावणी कंप्युटर तळेरे व मेधांश कंप्युटर कासार्डे च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देत उपस्थितींच्या मनाचा ठाव घेतला.


यावेळी डॉ. अभिजित कणसे, श्रावणी कंप्युटरचे सतीश मदभावे आणि श्रावणी मदभावे; मेधांश कंप्युटरच्या रीना दुदवडकर, अमोल धुमाळ उपस्थित होते.
यावेळी डॉ. कणसे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.


तळेरे: जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने तळेरे आठवडी बाजारात पथनाट्याद्वारे जनजागृती करताना तळेरेतील विद्यार्थी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 12 =