You are currently viewing विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखची दमदार कामगिरी:

विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखची दमदार कामगिरी:

विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या सोहम देशमुखची दमदार कामगिरी:

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा इयत्ता ८ वी तील विद्यार्थी कु. सोहम देशमुख याने सांगली येथे पार पडलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या खेळातील कौशल्याची छाप उमटवली. या स्पर्धेत एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील एकूण सहा सामन्यांपैकी सोहमने ३.५ गुणांची कमाई करत अंतिम क्रमवारीत ११ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, यावर्षी सोहमने आपल्या नेहमीच्या १४ वर्षे वयोगटाऐवजी १७ वर्षे वयोगटात खेळण्याचे आव्हान स्वीकारले. स्वतःपेक्षा अधिक वयाच्या आणि अनुभवी खेळाडूंशी सामना करतानाही त्याने अत्यंत आत्मविश्वासाने व उत्कृष्ट पद्धतीने खेळ करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. १७ वर्षे वयोगटातील ही स्पर्धा त्याच्यासाठी आव्हानात्मक असतानाही त्याने सहा सामन्यांत ३.५ गुण मिळवत केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरली.
सोहमची बुद्धिबळातील जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पाहता भविष्यात एक ना एक दिवस तो स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच उज्ज्वल करेल, असे त्याला पालक व शिक्षकांकडून प्रोत्साहन देण्यात आले . सोहमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा