ठाणे विभाग प्रमुख कै. प्रदीप पुणैकर यांच्या निर्घृण हत्येचा कळसुली विभागाच्या वतीने निषेध
आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी; कुटुंबीयांना लवकर न्याय मिळावा, अशी मागणी
कळसुली : ठाणे विभाग प्रमुख कै. प्रदीप पुणैकर यांची निर्घृण हत्या झाल्याने कळसुली विभागाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हत्येतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कळसुली विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. कै. प्रदीप पुणैकर यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कै. प्रदीप पुणैकर यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कळसुली विभागाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
