कणकवलीतील न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा बारावी निकाल दणदणीत
९९.५४% निकाल; २१७ पैकी २१६ विद्यार्थी उत्तीर्ण – शास्त्र, वाणिज्य व व्होकेशनल विभागाचा १००% निकाल
कणकवली :
येथील न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा अत्यंत उल्लेखनीय लागला असून तब्बल ९९.५४ टक्के निकाल नोंदवण्यात आला आहे. एकूण २१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शास्त्र विभागात ५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. या विभागात गायत्री विजयकुमार राठोड (७३.८३%) हिने प्रथम क्रमांक पटकावला असून अथर्व नारायण राणे (६९.८३%) द्वितीय तर नंदिनी कृपाल चौहान (६५.३३%) तृतीय क्रमांकावर आहेत.
कला विभागात ५७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८.२५ टक्के निकाल लागला आहे. या विभागात जानवी रविंद्र पाटील (७७.५०%) प्रथम, भूमिका दिगंबर पानकर (७७.१७%) द्वितीय तर गायत्री उमेश सुतार (७७%) तृतीय ठरली आहे.
वाणिज्य विभागात ६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. कोमल केशव गोसावी (८०.५०%) प्रथम, समाधान गजानन सावंत (७८.१७%) द्वितीय तर कोमल रावजी गायकवाड (७५.३३%) तृतीय क्रमांकावर आहेत.
व्होकेशनल विभागात ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे. या विभागात वैष्णवी दशरथ जोईल (७६.३३%) प्रथम, मोनिका विजय राठोड (७३.८३%) द्वितीय तर समृद्धी संतोष रासम (७०.१७%) तृतीय क्रमांकावर आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार, स्कूल कमिटीचे चेअरमन तसेच सर्व संचालकांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.
