You are currently viewing स्नेह नागरी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

स्नेह नागरी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

स्नेह नागरी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २८.७० लाखांचा नफा; सभासद व गुणवंत पाल्यांचा गौरव

सावंतवाडी

स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडीची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी NAB सभागृह, भटवाडी, सावंतवाडी येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सर्व सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संस्थेच्या वाटचालीसाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना संस्थेच्या ठेवी ३४.३८ कोटी रुपये, तर कर्जवाटप २४.९१ कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेने रोख व वैधानिक तरलतेपोटी पुरेशी गुंतवणूक केली असून, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला २८.७० लाख रुपये नफा झाल्याचे सभेत सांगण्यात आले.
संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेचे हे यश सर्व सभासदांचे सहकार्य, संचालक मंडळ, कर्मचारी तसेच पिग्मी प्रतिनिधी यांच्या योगदानामुळे मिळाले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
संस्थेच्या उन्नतीसाठी आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी भविष्यातही सभासदांचे सहकार्य मिळत राहावे, अशी अपेक्षा अध्यक्ष उचगावकर यांनी व्यक्त केली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन सभा व्यवस्थितरीत्या पार पडली.
यावेळी शैक्षणिक, क्रीडा, अभिनय तसेच अन्य विविध क्षेत्रांत विशेष यश संपादन केलेल्या सभासदांचा आणि त्यांच्या पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे सभेच्या वातावरणात उत्साह निर्माण झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा