विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
शेतकरी सेनेच्या वतीने सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी काही प्रमुख मागण्यासाठी विटा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी खानापूर कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजता शेतकरी सेना कार्यालयामध्ये हजर राहावे. असे आवाहन भक्तराज ठिगळे यांनी केले आहे.
चौंडेश्वरी मंदिर साळशिंगे रोड यशवंतराव पुतळ्याजवळ संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या अशा : शेतकऱ्यांची गोपुज शुगर गोपूज या कारखान्याकडे शेतकऱ्यांची असणारी मागील हांगामातील थकीत बिले शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत आदा करावीत. केन ऍग्रो ओंकार शुगर या कारखान्याकडे असणारी मागील हंगामातील उसाची दिले आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना अदा करावे. सन 2018 19 या हंगामा मधील शेतकऱ्यांची आठ वर्षे थकीत असणारी केन ऍग्रो डोंगराई या कारखान्याकडे असणारी ऊसाची बिले आठ दिवसाच्या आत आदा करावी. शेतकऱ्यांना चालू 2026 /27 या चालू होनारा हंगामामध्ये ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये दर जाहीर करावा.कारखानदार करत असणारी शेतकऱ्यांच्या उसाचे काटामारी थांबवावी यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी. शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यावरती गेल्यानंतर शेतकऱ्यांना काटा पेमेंट करावे. खानापूर कडेगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा वरती वनक्षेत्र सदृश मारलेला शेरा तातडीने कमी करावा. महावितरण वीज कंपनीने शेतकऱ्यांना शेती पंपांना पूर्ण क्षमतेने किमान आठ तास विज द्यावी. महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सिंगल फेस टू फेस चे काढून नेलेले स्टार्टर तातडीने परत द्यावे.
