You are currently viewing उद्या भाजपाचा अन्यायकारक विजबिलांविरोधात धमाका..

उद्या भाजपाचा अन्यायकारक विजबिलांविरोधात धमाका..

कुडाळमध्ये महावितरण विरोधात महाउद्रेक! वीज कार्यालयाला शेकडो भाजपा कार्यकर्ते घालणार घेराव!!

कुडाळ प्रतिनिधी

कोरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगाराचे संकट उदभवले असतानाही महावितरण मात्र निष्ठुरपणे प्रचंड मोठमोठी बिले ग्राहकांना पाठवत आहे. याविरोधात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्रे पाठवण्याचे आंदोलन भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस मा.रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत यापूर्वीच झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही या संदर्भात झालेली नसल्याने निष्क्रिय राज्यसरकारच पडद्यामागून ही सूत्रे चालवत जनतेला नाडत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. जनतेची आर्थिक लूटमार होऊ न देण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरत आहे.-आर्थिक मंदीने तसेच कोरोना महामारीने आधीच जनतेचे कंबरडे पार मोडले असताना चुकीची अवास्तव बिले व वसुली यांनी जनतेला जेरीस आणले आहे. महावितरणची अशा प्रकारची लूटमार तातडीने थांबली पाहिजे, सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा ही मागणी घेऊन भाजपा कार्यकर्ते कुडाळमध्ये आंदोलन करणार आहेत. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष गोपाळ हरमलकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण शहर मंडल अध्यक्ष दीपक पाटकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप गावडे, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. समिधा नाईक, उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ शहर अध्यक्षराकेश कांदे, कुडाळ महिला शहर अध्यक्षा सौ ममता धुरी, सर्व जिल्हा व तालुका सेलप्रमुख, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो भाजपा कार्यकर्ते उद्या कुडाळ महावीतरणला धडक देणार आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी व्हावे, मात्र कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे. उद्या दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजप कार्यालय, कुडाळ येथे सर्व कार्यकर्ते एकत्र जमतील व त्यानंतर महावितरणकडे आंदोलनासाठी रवाना होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =