You are currently viewing सावंतवाडी मध्ये उद्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी मध्ये उद्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी:

दिनांक 9 ऑक्टोबर रोजी राजवाडा सावंतवाडी येथे सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उषःकाल अभियान मल्टी-सुपर स्पेशालिस्ट’, हॉस्पिटल सांगली या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून श्री. सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती असणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. निरज अग्रवाल अतिरिक्त महानिदेशक, पश्चिम भारत प्रसार भारती यांची उपस्थिती लाभणार आहे.मा. के. मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या असणार आहेत.

या शिबिराची वैशिष्ट्ये म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ, नि:शुल्क इ.सी.जी. आणि 2D Eco तपासणी, अस्थिव्यंगशल्यचिकित्सक (ऑर्थोपेडिक), जनरल/सर्जन जनरल /फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, पेन मॅनेजमेंट, संबंधित आजारावर मोफत प्राथमिक औषधे वाटप .

या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.लखनराजे भोसले , ॲड. श्री नकुल पारसेकर, समन्वयक डॉ.अमेय प्रदीप देसाई यांनी केले. नाव नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क करावा श्री.विश्वनाथ सनाम-9657181689, श्रीमती प्रज्ञा तांबे-9765423166, श्री. एल.एम.सावंत-9422943475, डॉ. उमेश पवार-8329060458, डॉ.संदीप पाटील-7588058784.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 10 =