You are currently viewing कै.बंडोपंत भिसे स्मृती राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा

कै.बंडोपंत भिसे स्मृती राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा

अनिल भिसे मित्र मंडळाचे आयोजन

सावंतवाडी
सावंतवाडीतील अनिल भिसे मित्रमंडळातर्फे छायाचित्रकार तथा जेष्ठ पत्रकार कै. मुरलीधर गणेश उर्फ बंडोपंत भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीत व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च २०२१ रोजी बंडोपंताचा स्मृतिदिन असून २८ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत ८ – १२ आकारामध्ये स्पर्धकांनी आपले छायाचित्र एका स्पर्धकाचे एकच छायाचित्र स्पर्धेसाठी हवे आहे. छायाचित्राच्या मागे स्पर्धकाचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहावयाचा आहे.
सदर छायाचित्र रत्नाकर माळी (९४२०७३९१७३) श्रीकृष्ण मुद्रणालय, वैश्यभवन हॉल समोर, गवळीतिठा, सावंतवाडी याठिकाणी आणून दयावयाचे आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा