You are currently viewing मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

मातीखालून सापडलेल्या सरड्याच्या अंड्यांमधून 10 पिलांचा जन्म

वेंगुर्ला तुळस मधील सर्पमित्र महेश राऊळ यांची चौथ्या वेळी यशस्वी कामगिरी

तुळस

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून 10 पिलांना जन्म देण्यात सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांना यश आले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने त्यांची ही चौथी यशस्वी कामगिरी आहे.

तुळस येथील राजू परुळकर यांच्या घराच्या कामासाठी ठेवलेल्या वाळू मधून बाहेर आलेली सुमारे १४ अंडी आढळून आली होती. उन्ह, मुंग्या आणि इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे ती नष्ट होण्याची शक्यता होती. परूळकर यांनी महेश राऊळ यांना फोन करून याची माहिती दिल्यावर सर्पमित्र महेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व अंडी अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित स्थळी हलवली.

त्यांनी घरातच ओलसर माती व नारळाच्या भुशाचा वापर करून निसर्गसदृश उबवण केंद्र तयार केले. सुमारे 20 दिवस अचूक तापमान व आर्द्रतेची काळजी घेतल्यानंतर या अंड्यांमधून 10 निरोगी पिलांचा जन्म झाला. सर्व पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

*उल्लेखनीय आहे की, यापूर्वीही महेश राऊळ यांनी तेल सरडा (Skink) आणि गार्डन लिझार्ड अशा दोन प्रकारच्या सरड्यांची अंडी तीन वेळा यशस्वीरित्या उबवून सरड्यांच्या पिलांना जीवदान दिले आहे.* त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे वन्यजीव संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

*”सापांप्रमाणेच सरडे देखील शेतकऱ्यांचे मित्र आहेत. ते कीटकांवर नियंत्रण ठेवतात. प्रत्येक अंड्यामागे एक जीव असतो, तो वाचवणे हे आपले कर्तव्य आहे,” या सृष्टीतील प्रत्येक सजीवांना जगण्याचा अधिकार आहे..जगवा आणि जगा याचं माणसाने तंतोतंत पालन केले पाहिजे.. जिवश्रुष्टि टिकली तरच आपण टिकणार आहोत…असे महेश राऊळ यांनी सांगितले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा