You are currently viewing नीट उत्तीर्ण ज्ञानेश नाईकला शिक्षणासाठी २० हजारांची मदत

नीट उत्तीर्ण ज्ञानेश नाईकला शिक्षणासाठी २० हजारांची मदत

नीट उत्तीर्ण ज्ञानेश नाईकला शिक्षणासाठी २० हजारांची मदत

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून आर्थिक हातभार; पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा

सावंतवाडी : प्रतिनिधी
नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे येथील लोकमान्य होमिओपॅथी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या ज्ञानेश गणेश नाईक या होतकरू विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
ज्ञानेश हा हुशार व होतकरू विद्यार्थी असून त्याला शिक्षणाची विशेष आवड आहे. मात्र, पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व सदस्या शरदिनी बागवे यांच्याशी संपर्क साधला. त्याची परिस्थिती लक्षात घेऊन शरदिनी बागवे यांनी वैयक्तिकरित्या १० हजार रुपये, तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे करण्यात आली.
यावेळी ज्ञानेशला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, शरदिनी बागवे, रवी जाधव, ज्ञानेश नाईक व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा दवळी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा