चव्हाण नगर, धनकवडी – नामांकित चव्हाण फाऊंडेशन तर्फे चालविल्या जाणाऱ्या पद्मजा चव्हाण करिअर इन्स्टिट्यूट गेल्या पंचवीस वर्षाची सांस्कृतिक परंपरा जपत गृहिणी, महिलांना स्वावलंबी तसेच उद्योजिका बनवण्याचे स्वप्न साकार करणारी इन्स्टिट्यूट आहे.
एकाच छताखाली 150 प्रकारचे कोर्सेस दिले जातात.
त्यामध्ये सर्व प्रकारची इन्स्टंट पीठे, सर्व प्रकारचे मसाले, केक्स, नानकटाई, बिर्याणीचे प्रकार नॉनव्हेज, सर्व प्रकारच्या ग्रेव्ही व्हाईट, रेड, ग्रीन, ऑरेंज, सॅलेडचे सर्व प्रकार, चायनीज, बंगाली, पंजाबी, गुजराती, कोल्हापुरी पध्दतीच्या रेसिपीज शिकविल्या जातात.
याशिवाय दिवाळीचे सर्व प्रकार पदार्थ, तिळगुळाचे प्रकार तिळगुळाच्या वड्या, विविध प्रकारचे पराठे, विविध प्रकारच्या चटण्या, खाकरे व विविध प्रकार, उन्हाळी पदार्थ कुरडई, सांडगे, पापड, अळूवडी, सुरळी वडी, कोथिंबीर वडी, गाजर हलवा, मूग हलवा, हलव्याचे विविध प्रकार, हुरडा व हुरड्याचे प्रकार, विविध प्रकारची लोणची 25 प्रकार, आवळा नि आवळ्याचे पदार्थ याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाते.
तसेच कळण्याची भाकरी, कोंबडी वडे, मालवणी चिकन, कोळंबी व कोळंबीचे पदार्थ, खेकडा रस्सा, खेकडा फ्राय, मासे व माशाचे विविध प्रकार करणे याचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक दिले जाते. मोदकाचे विविध प्रकार, उकडीचे, तळलेले, वाफवलेले आणि कटाची आमटी, पुरणपोळी, विविध प्रकारच्या भाज्या, इन्स्टंट सूप, सूपचे प्रिमिक्स बनविणे शिकविले जाते. विविध प्रकारच्या कोशिंबिरी दाखविल्या जातात.
चवनप्राश, विविध प्रकारच्या सुपार्या, जाम जेली, विविध प्रकारचे चॉकलेट, विविध प्रकारचे आईस्क्रीम, विविध प्रकारची सरबते, फळ प्रक्रिया याचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षक देतात.
क्लॉथ पेंटिंग, मधुबनी आर्ट, वारली आर्ट, कॉफी पेंटिंग, निब पेंटिंग, भरत काम, विणकाम, जर दोसी, आरी वर्क, विविध प्रकारची फुले, ऑरगंडीची फुले, कॅनव्हासची फुले, कागदी फुले, ओरिगामी, क्राफ्ट, ब्रेडची फुले, ब्रेड क्राफ्ट, व्यावसायिक पध्दतीने पेपर बॅग, आकाश कंदील, सर्व प्रकारच्या कॅण्डल, सर्व प्रकारच्या राख्या, खणाची ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी, फुलांच्या माळा, विविध प्रकारची तोरणे, पिशव्या, झबले टोपडे, विविध प्रकारचे गोंडेअॅक्रीलिक रांगोळी,आर्टिफिशल रांगोळी, फ्लॉवर बुके,नॅपकिन बुके याचेही प्रशिक्षण मिळते.
इथे टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेचा योग्य उपयोग केला जातो.
सिरॅमिक पॉट, डांबर फ्लॉवर पॉट, फ्लॉवर पॉट, नेमप्लेट,
गिफ्ट पॅकिंग, इकेबाना जपानी फुल रचना शिकविली जाते.
फ्लॉवर अरेंजमेंट, डोहाळे जेवण पुष्परचना, विविध कार्यक्रमासाठी पुष्परचना कशी करावी हे दाखविले जाते.
गोधडी, विविध प्रकारची दुपटी, विविध प्रकारची टोपडी कुंची,
लोकर व लोकरी पासून स्वेटर झबले टोपडे, साडी तसेच बेडशीट यावर भरत काम करायचे शिकवले जाते.
स्टार्ट अप औद्योगिक क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या महिलांना आयुर्वेदिक शाम्पू, आयुर्वेदिक क्रीम, आयुर्वेदिक तेल, घरच्या घरी ड्रायक्लीन, फिनेल शाम्पू बनविणे, वेगवेगळ्या प्रकारचे साबण करणे याचे अनुभव मिळतात.
रुखवत, मॅक्रमच्या वस्तू, सजावटीसाठी विविध प्रकारचे धबधबे, पायपुसणी व त्याचे प्रकार नथ क्लास साठी देखील प्रशिक्षण दिले जाते.
तसेच टीचर ट्रेनिंग बालवाडी प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षण,
नॅचरोथेरपी प्रशिक्षण वर्ग, नर्सिंग असिस्टंट कोर्स,जिम ट्रेनर . याव्यतिरिक्त ब्युटी पार्लर बेसिक कोर्स, ब्युटीपार्लर, ऍडव्हान्स,मेकअप कोर्स,हेअर स्टाईल बेसिक, ॲडव्हान्स, ॲडव्हान्स मेंदी यासह फाईल प्रशिक्षण,बेकरी प्रशिक्षण, ऍडव्हान्स कुकरी प्रशिक्षण महिलांना मिळते.
संत साहित्याच्या अभ्यासक, साहित्यिक, उद्योजिका, व्याख्यात्या , डॉक्टर गिरीजा शिंदे सामाजिक जाणीवेतून संचालक म्हणून पद्मजा चव्हाण करिअर इन्स्टिट्यूट येथे कार्यरत आहेत.
