You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचा  निकाल

जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचा  निकाल

जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचा  निकाल

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारा जिल्हास्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचा जिल्हा क्रीडा संकुल येथे यशस्वीरित्या पार पाडल्या. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.

स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली, कळसुली इंग्लिश स्कुल कळसुली, माध्यमिक विदयामंदिर असरोडी, विदयामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल, श्री माधवराव पवार विदयालय कोकिसरे, आयडियल इंग्लिश स्कुल वरवडे, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी,सेंट उर्सुला स्कूल वरवडे या शाळांमधून एकूण 25 खेळाडू उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आर्चरी असोसिएशन ऑफ सचिव अमित अशोक जोशी    तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे अच्युतराव विश्वनाथ वनवे, अक्षय कुलकर्णी हे उपस्थित होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून अविराज अंकुश खांडेकर, साईराज महेश सावंत, अमित जोशी, अक्षय कुलकर्णी, अच्युतराव वनवे, सचिन हरमलकर,रामचंद्र घावरे,कमलेश गोसावी या पंचाच्या सहकार्याने स्पर्धा पार पाडण्यात आल्या. तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडूच अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

14 वर्षाखालील मुले, प्रथम- साई विजय मोहिते, द्वितीय,  उत्कर्ष समीर सावंत, तृतीय- अस्मित शैलेश मुळीक.14 वर्षाखालील मुली प्रथम- अकसा मुद्दसरनाझर शिरगावकर, द्वितीय,वैखरी योगेश सावंत, तृतीय, अर्शिया सरफराज काजरेकर.17 वर्षाखालील मुले, प्रथम- कु. आदित्य अच्युतराव वनवे, द्वितीय, निहाल संदिप मोंडकर, तृतीय- कु. प्रज्योत अरुण जैतापकर.17 वर्षांखालील मुली प्रथम-  चैत्राली चांगाप्पा पाटील, द्वितीय, धैर्या विजय गावकर, तृतीय, प्रगती आशिषकुमार हळणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =