विलास परब वकील यांच्यासह परब कुटुंबीयांनी ओसरगावच्या महागणपतीचे घेतले दर्शन
बारा-पाचाच्या मांडा वरील महागणपती व ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे दर्शन; दिलीप राणे यांनी केले स्वागत
ओसरगाव | प्रतिनिधी :
भारत सरकारचे नोटरी, ओसरगावचे सुपुत्र व जिल्ह्यातील कायद्याचे गाढे अभ्यासक विलास परब वकील, त्यांचे बंधू राजेंद्र परब तसेच प्रसिद्ध मूर्तिकार व पेंटर संजय परब आंबेरकर यांनी ओसरगाव येथील बारा-पाचाच्या मांडा वरील नवसाला पावणाऱ्या महागणपतीचे तसेच ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे दर्शन घेतले.
यावेळी दिलीप राणे यांनी परब कुटुंबीयांचे स्वागत केले. विलास परब वकील व त्यांचा परिवार गेली अनेक वर्षे वर्षातून चार ते पाच वेळा ओसरगाव येथे येत असून, सुख-दुःखाच्या प्रसंगी राणे परिवाराच्या सोबत उभे राहतात. त्यांच्या या जिव्हाळ्याच्या संबंधाबद्दल राणे परिवाराच्या वतीने परब कुटुंबीयांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
