*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बाई….*
रोज उन्हातान्हात ती
अंगावर चटके घ्यायची
गावभर हिंडून काहींना काही विकायची
विकत घेण्याचा तिचा आग्रह असायचा
तेव्हा तिला लेकरांच्या पोटातला
भुकेचा वणवा पेटलेला दिसायचा
घाम कष्टाचा निपळून ती
स्वतःची भूक मारायची
दिवसभर पायपीट करून
दोन पैसे मिळवायची
बघणाऱ्यांची नजर मात्र
तिच्या फाटक्या कपड्यांवर असायची
वेदना घेऊन तशीच ती
गल्लोगल्ली फिरायची
कितीतरी नजरा
तिच्या आवाजाच्या दिशेने वळायची
तेव्हा तिची नजर शरमेने खाली झुकायची
तरीही ती माणसांच्या गर्दित
धैर्याने फिरायची
फाटक्या लुगड्यात आब्रु झाकून
स्वतःला सांभाळायची
सुखरूप घरी आल्यावर मग ती
देवा पुढे दिवा लावायची
रोज अशा कितीतरी
नजरांच्या जखमा घेऊन
ती घरी परतायची
लेकर पोटभर जेवताना बघून
ती आपली फाटकी चोळी शिवायची
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
