You are currently viewing भाजप प्रदेश सचिव माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना भाजपयुमो तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा…

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना भाजपयुमो तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा…

भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे आज रोजी संपन्न

माजी खासदार भाजपा सचिव मा निलेशजी राणे व युवा वॉरियर्स कोकण प्रभारी श्री अविनाशजी राऊत यांनी उपस्थित राहून भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच युवा वॉरियर्स तसेच युवा मोर्चाच्या बूथ कमिटी संदर्भात चर्चा करण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे माजी खासदार निलेशजी राणे यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात साजरा केला जातो आज पडवे येथे केक कापून युवा मोर्चाच्या माजी खासदार भाजपा सचिव निलेशजी राणे यांना वाढदिवसाच्या युवा मोर्चाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस बाबा परब, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब प्रवक्ते दादा साईल तसेच सर्व मंडल अध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा