अमरावती :
अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी मिशन आयएएस डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी, प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट या भव्य सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यस्तरीय चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, गीत गायनाचा कार्यक्रम व समाजाभिमुख महिला व साहित्यिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या झालेल्या या कार्यक्रमाला दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या सचिव व सुप्रसिद्ध लेखिका व वक्त्या श्रीमती भाग्यश्री बानाईत, दिल्लीचे सी आर पी एफ चे कमांडट डॉ. चेतन शेलोटकर, नव्याने आयएएस झालेले श्री हेमकृष्ण फिसदे व अकोला जिल्ह्यातील पातुर येथील रेणुका केनन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाचं औचित्य साधून अमरावती शहरातील व जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या काही सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा साहित्यिकांचा व कवयित्रींचा सन्मान सावित्रीबाई फुलेंवरील 600 रुपये किमतीचा गौरव ग्रंथ देऊन सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय भ कार्यकारणी सदस्य डॉ. जयश्री कुलकर्णी, बालकल्याण क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या सुचिता बर्वे, ख्यातनाम कवयित्री शीतल राऊत, निवेदिका लेखिका रंजना कराळे, वृद्धांसाठी संस्था चालवून त्यांना आधार देणा-या उत्कृष्ट निवेदिका पल्लवी यादगिरे,(वैद्य) उद्योजिका व लेखिका कांचनताई उल्हे, मृत्यंजया, उत्तम निवेदिका, बाहुलीनाट्यातील निपूण दीपाली बाभुळकर, कवयित्री, शिक्षिका, उत्तम वक्ता आरती नागपुरे, इंगोले प्रतिष्ठानच्या संचालक, उत्तम कवयित्री, विचारवंत डॉ शुभांगी इंगोले, उत्कृष्ट कवयित्री, लेखिका शिवांगी वेरूळकर, कीर्तनकार कवयित्री छायाताई पाथरे, राज्यनिवेदिका लेखिका ज्योती देशपांडे आणि समाजसेविका, नर्सिंगच्या संचालक अनीता रामटेके, व-हारडी लेखिका सुलभा गोगरकर, पहिल्या महिला छायाचित्रकार शालिनी कावरे,महिला सक्षमीकरणात अव्वल काम करणार-या माधुरी चव्हाण, कवयित्री, शिक्षिका मंजू वानखडे, सीमा भांदर्गे, सुशीला मळसने, कादंबरीकार छाया राऊत, शिक्षक बॅंकेच्या संचालिका सरिता काठोळे, सामाजिक कार्यकर्त्या योगिता भुसारी, समाजसेविका महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त व मा. महिला व बालकल्याण सभापती अमरावती महानगरपालिका श्रीमती प्रभाताई आवारे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भाकरे, मंजुश्री देशमुख कवयित्री अंजली वारकरी, इंदुताई गावंडे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष मनाली तायडे, कार्यकर्ता स्वप्नाली देशमुख, प्रतिभा रोडे, वर्षा कडू, वर्षा ठाकरे, जोत्स्ना शेटे हर्षा ढोके, वर्षा धाबे, सुरेखाताई धर्माळे, मंजुषा पाथरे, कोन बनेगा करोडपती फेम शोभना देशमुख व स्मिता गोळे यांना सन्मानीत करण्यात आले.
या सत्कार प्रसंगी विचारपिठावर संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशिवाय मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवेंद्र खडसे मिशनचे संचालक प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे सचिन माळकर स्वागत अध्यक्ष डॉ. पंजाबराव कथे डॉ पंजाबराव देशमुख अकादमीच्या सहसंचालिका पल्लवी एरुळकर कार्यकारिणी सदस्य श्री प्रवीण वासनिक कविसंमेलन समन्वयक आबासाहेब कडू, राज कपूर डोंगरे व आदी मान्यवर उपस्थित होते.
