*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई /माय*
भल्या पहाटे उठून
माय जाय सरपनाला
काट्या निंबा बाभळीच्या
जोडीते रोज मोळीला
भुई सडा सारवण
चूल भानोसे पोत्यारी
शेणकुर गोठ्यातले
राम प्रहरेच्या प्रहरी
मोळी डोईवर घेई
पायी चाले अनवाणी
दिसता रानशिनी गौरी
घेई हाती उचलुनी
गोषपदांच्या रांगोळीत
रंग भरते पाहून
मुखी हरिपाठ म्हणे
पुजा तुळशीला वाकून
तामतौलीत घुगऱ्या
औलावरी शिजण्याला
लागे बीगी बीगी बाई
भाकरीला थापण्याला
उपरवाट्याचं लुगडं
माय घेई गुंडाळून
झोळीतल्या गोंडसाला
नीजवी अंगाई म्हणुन
माझ्या मायेची अंगाई
आजही ओठांत माझ्या
येते स्वप्नात जेंव्हा
करते आठवणी ताज्या
*शीला पाटील. नासिक*
